पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन.!

138

सिंधुदुर्ग/ ब्युरो न्युज :सनी चॅरिटेबल ट्रस्ट नवी मुंबई व श्वेतगंध सोशल फाउंडेशन,डोंबिवली व समृद्ध पब्लिकेशन्स, महाराष्ट्र आयोजित समाज प्रबोधन, जनजागृती, वैचारिक क्रांती…. चला सुरुवात आपल्यापासून करूया, धर्म, संस्कृती, समाज याचे संरक्षण व लोकशाही विचारांना एकत्र करणारा ऐतिहासिक गुणवत्तेचा सर्वश्रेष्ठ सन्मान सोहळा पार पडणार आहे. राष्ट्रीय कर्तुत्व ज्योतिर्मय सद्भभावना संमेलन , ठाणे २०२३ रविवार दि.९ एप्रिल, २०२३ रोजी सकाळी ११ वा. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे येथे हक कार्यक्रम संपन्न होणार आहे. गौरव तुमचा ..आनंद आमचा.! समाज मन घडवणाऱ्या गुणवंताचा सन्मान सोहळा. यावेळी सुप्रसिद्ध जेष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष मा. विजयजी पाटकर यांच्या शुभहस्ते व अन्य नामवंत मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच सामाजिक, शैक्षणिक, कला – क्रीडा, सांस्कृतिक, साहित्यिक, गुणवंत कामगार, आदर्श सरपंच, उद्योजक, उद्योजिका, ग्रामसेवक, संस्था, युवक – युवती आदींसह सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या इच्छुकांनी आपली माहिती प्रस्ताव किंवा बायोडाटा, आधार कार्ड, फोटोसह संयोजक समृद्धी प्रकाशन, सिंधुदुर्ग 9421189821 व 9359337468 या व्हाट्सअप नंबर वर दि. २ एप्रिल २०२३ पर्यंत पाठवावेत. प्रथम नावनोंदणी करणाऱ्या २५ जणांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. हा संपूर्ण कार्यक्रम सिंधु सेवा आश्रमास समर्पित करण्यात आला आहे. तरी सहभागी होण्याचे आवाहन निवड समितीच्या वतीने करण्यात आले आहे.