आज शेर्ले मंदिराचा भूमिपूजन समारंभ.!

64

 

बांदा : शेर्ले येथील श्री देवी माऊली रवळनाथ पंचायतन देवस्थानच्याl मंदिरातील श्री देवी माऊली मंदिराचा भूमिपूजन समारंभ आज गुरुवारी सकाळी १० ते दुपारी ३ दरम्यानच्या शुभमुहूर्तावर संपन्न होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.शेर्ले येथील प्रमुख देवस्थानातील प्रमुख मंदिरे ही सुमारे १५ व्या ते १६ व्या दशकात पूर्वजांनी सांस्कृतिक व सामाजिक बांधिलकीतून उभारली आहेत.

मंदिरे १६ व्या शतकातील असत्यामुळे फारच जीर्ण अवस्थेत आहेत. पूर्वजांनी निर्माण केलेला हा भक्तीचा ठेवा, त्याचे जतन करण्यासाठी शेर्ले ग्रामस्थ व मानकरी एकत्र येऊन लोकसहभागातून मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी सुमारे दोन कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे.