सागर नाणोसकर यांच्या गाडीसमोर अचानक गवारेडा आला…वाचा पुढे काय झालं

सावंतवाडी : भर दिवसा दुपारी एक वाजता न्हावेली सावंतवाडी मुख्य रस्त्यावर माळकर टेंब येथील वळणावर गवारेडा  दिसून आला. उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा  नाणोस ग्रामपंचायतीचे सदस्य सागर नाणोसकर यांच्या गाडीसमोर अचानक गवारेडा रस्त्यावर आला. सागर नाणोसकर यांनी आपल्या गाडीवर वेळीच नियंत्रणमिळवल्याने अपघात टळला. मात्र दिवसाढवळ्या रस्त्यावर येणाऱ्या गवारेद्यांचा वनविभागाने वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.