कणकवलीत महिला आघाडीचे महागाई विरोधी आंदोलन
कणकवली | मयुर ठाकूर : कणकवलीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तसेच महिला आघाडीच्या महिला एकत्र येत कणकवली येथील पटवर्धन चौकात महागाई विरोधी आंदोलन सुरू केले आहे. साधारणपणे या आंदोलनात सुरुवातीला १५० हून अधिक महिला उपस्थित आहेत. भावोजी भावोजी ….म्हागायचे खोके…. एकनाथ म्हणतात सगळंच ओके….दिल्लीतलो चायवालो खय ऱ्हावलो म्हागायचो चटको गरीबाक लागलो ….. गाडी इली गाडी इली गॅस सिलेंडरची गाडी.! बायका पोरा चीडीचाप झाली….. आनंदाचो शिधो मिळालो काय गो..! साखर, तांदळाचा पोता पळाला खय गो..! पन्नास खोके…महागाई ओके…अशा पद्धतीचे बोर्ड देखील आंदोलन स्थळी महिला आघाडीच्या आंदोलकांनी लावलेले आहेत आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आंदोलनाची सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते.
दरम्यान यावेळी पटवर्धन चौकात महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नीलम पालव, महिला तालुकाप्रमुख वैदही गुडेकर, उप महिला तालुकाप्रमुख संजना कोलते, स्वरूपा विखाळे, मानसी मुंज, दिव्या साळगावकर, माधवी दळवी प्रतिभा अवसारे रोहिणी पिळणकर संजना साटम, आम. वैभव नाईक, जिल्हा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, राजू राठोड, शैलेश भोगले, निसार शेख, कन्हैया पारकर, महेश कोदे यांच्यासह १५० हुन अधिक महिला या महागाई विरोधी आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.





