कुडाळ : माजी खासदार तथा भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांनी आवळेगाव पोलीस ठाण्याला अचानक भेट दिली. आवळेगाव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवा. पोलीस अधिकाऱ्यांना निलेश राणेंकडून दूरध्वनीद्वारे सूचना. कुडाळ तालुक्यातील आवळेगाव पोलीस दुरक्षेत्र कार्यालय हे वारंवार असते बंद येथे कायमस्वरूपी कर्मचारी नाहीत अश्या स्वरूपाची तक्रार भाजपा नेते निलेश राणे यांच्याजवळ स्थायिकांकडून करण्यात आली. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी आज आवळेगाव पोलीस दुरक्षेत्र कार्यालयाला दिली भेट. यावेळी पोलीस कार्यालय बंद अवस्थेत आढळून आलं, निलेश राणे यांनी जिल्हा पोलिस मुख्यालयातील वरिष्ट पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क करत कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची सूचना दिल्या. आवळेगाव दुरक्षेत्र अंतर्गत एकूण २२ गाव असून दुर्गम भागातील लोकांना पोलीस ठाण्यात कायमस्वरूपी कर्मचारी नसल्याने मोठ्या समस्येचा सामना करावा लागत होता.





