शिरोडा येथे दुचाकी जळून खाक | सुदैवाने चालक युवती बचावली.

52

 

वेंगुर्ले : शिरोडा बाजारपेठ येथे गावडे प्रिंटिंग प्रेस च्या मागे लावलेली दूचाकी चालू करताना स्पार्क होऊन पेटली आणि त्या आगीत पूर्ण जळाली. या मध्ये सुदैवाने दुचाकी चालू करणारी युवती राय वेळीच बाजूला गेल्याने बचावली आहे. शिरोडा बाजार पेठ येथे आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सदर राय युवती घरी जाण्यासाठी आपली दुचाकी सुरू करत होती. मात्र दुचाकी सुरू करताना स्पार्क होऊन गाडीमधून धूर यायला लागला. बघता बघता काही क्षणात गाडीने पेट घेतला आणि गाडी जळून खाक झाली. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी पाणी व अन्य साहित्याच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. दरम्यान याप्रकरणी उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती.