आरोग्य उपसंचालकांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातल्या ‘या’ विभागाचं केलं कौतुक 

50

सावंतवाडी : कोल्हापूरआरोग्य उपसंचालक डॉक्टर कांबळे यांनी आज जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना अचानक भेट देत पाहणी केली. या पाहणी दरम्यान सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभागातीला भेट देत पाहणी केली. यावेळी या विभागातील गरोदर माता व स्तनदा माता यांचीतर उपसंचालक डॉक्टर कांबळे यांनी विचारपूस करत डॉक्टर व परिचारिका यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या सेवेबाबतही माहिती घेतली. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभागातील महिलांनी आपल्याला उत्तम प्रकारे आरोग्य सेवा मिळत असल्याचे मत उपसंचालक डॉक्टर कांबळे यांना बोलून दाखवले. या भेटी वेळीसिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नागरगोजे, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉक्टर दुर्भाटकर, बालरोग तज्ञ डॉक्टर संदीप सावंत उपस्थित होते.