मुंबई : शिवसेनेतील फूट आणि राज्यातील सत्तासंघर्षांसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, सत्तासंघर्षाचा पेच आणखी लांबणीवर पडला आहे. कारण या प्रकरणाची सुनावणी १४ फेब्रुवारीला होईल, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांनी दिली आहे. दरम्यान, याबाबत खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.





