सख्ख्या भावानेच केली भावाची हत्या | कणकवली तालुक्यातील धक्कादायक घटना

76

कणकवली : दोन भावांमध्ये झालेल्या वादातून एका भावाने धारदार चाकु च्या सहायाने दुसऱ्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना कणकवलीतील कुंभवडे चिरेखनवाडी येथे काल बुधवारी रात्री घडली. या घटनेत स्टनी अंतोन डिसोझा (कुंभवडे, ३७, चिरेखनवाडी) हा तरुण ठार झाला. घटनेनंतर कुंभवडे मधील अनेकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

याप्रकरणी आरोपी आयसीन अंतोन डिसोजा ( कुंभवडे, ३७, चिरेखनवाडी ) याच्यावर कणकवली पोलिसात ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मार्टिन अंतोन डिसोजा ( कुंभवडे, ६०, चिरेखनवाडी ) यांनी याबाबत फिर्याद दिली असून, घटनेतील मयत व आरोपी हे फिर्यादी चे मुलगे आहेत. आई वडील लहान मुलगा असलेल्या मयत स्टनी याचे जास्त लाड करतात या रागातून आरोपी आयसीन अंतोन डिसोजा याने घरातील चाकू भाऊ स्टनी याच्या पोटात घुसून त्याला ठार केले. या घटनेनंतर स्टनी हा अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या घटनेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.