कळसुली हर्डी फाटा येथील नित्कृष्ट दर्जाचं सुरू असलेले काम ग्रामस्थांनी अखेर रोखले

80

कणकवली : कळसुली डोंगरी फाटा ते कळसुली हर्डी फाटा येथे डांबरीकरण करत असलेल्या रस्त्याचे काम नित्कृष्ट दर्जाचं सुरू असल्याचे कळसुली ग्रामस्थांच्या लक्षात येताच, स्थानिक ग्रामस्थांनी ऐकत्र येत निकृष्ट दर्जाचे काम बंद पाडले. सा.बां.विभागाच्या अधिकारी व ठेकेदार यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन निकृष्ट दर्जाचे ग्रामस्थांनी बंद पाडलेल कामाची पाहणी करून दर्जेदार रस्ता बनवून देणार असल्यांचे आश्वासन ग्रामस्थांना दिल्यावर कामाला सुरूवात .

यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते कृष्णा कोरगावकर, वामण चव्हाण, राष्ट्रवादी युवक जिल्हा सरचिटणीस रुजाय फर्नांडिस, अक्षय मुरकर, महादेव वरक, बाळा भोगले, पंढरी मुरकर, आणि कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.