कुडाळ : मुंबईहून येणाऱ्या सावंतवाडी-तुतारी एक्सप्रेसमधील स्लीपर कोच डब्यात रेल्वे प्रवाशाने विसरून गेलेली बॅग कोकण रेल्वेचे टिसी विठोबा राऊळ यांनी प्रसंगावधान राखत रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिली. सदरच्या या बॅगेत सुमारे १ लाख रुपये व मौल्यवान वस्तू होत्या. टीसी विठोबा राऊळ यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल कोकण रेल्वेची प्रतिमा उज्वल केली असून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.
Home ब्रेकिंग न्यूज कोकण रेल्वेचे टिसी विठोबा राऊळ यांचा प्रामाणिकपणा | रोख रक्कमेसह लाखो रूपयांचे...





