कणकवली तहसीलदार कार्यालयात जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

59

कणकवली : जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हातील सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असताना कणकवली तहसीलदार कार्यालयात देखील कर्मचाऱ्यांनी आज टोल वाजवून जोरदार घोषणाबाजी केली व आंदोलन केले. कर्मचाऱ्यांनी तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर येत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आर. एम. कांबळे जिल्हाध्यक्ष अंशदायी पेन्शन योजना व तालुकाध्यक्ष महसूल संघटना कणकवली, एन. एस लांबर अध्यक्ष तलाठी संघटना, कणकवली, श्रीकांत जाधव, रणजीत चौगुले, बापू जाधव, महादेव बाबर, सुचित्रा आडारकर, आदी सहभागी झाले होते.