कुडाळ : अणाव ग्रामपंचायत तर्फे महिला दिनानिमित्ताचे औचित्य साधून रविवार दिनांक १९ मार्च रोजी महिलांसाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. यात विविध क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या महिलांना सन्मानित केले.
यात अणावच्या माजी महिला सरपंच, वैशाली परब, सेजल पाटकर, माजी प. स. सदस्या श्रीमती उर्मिला अणावकर आजी माजी ग्राम पंचायत महिला सदस्या, डाटा ऑपरेटर, ग्राम पंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका , मदतनीस, वाचनालय कर्मचारी शालेय पोषण आहार स्वयंपाकी यांना सन्मानीत करण्यात आले. महिलांसाठीच्या आरोग्य शिबिरात मोठ्या संख्येने महिला लाभार्थ्यांनी उपस्थिती दाखवली. यात तज्ञ आरोग्य अधिकारी डॉ. चेतना चुबे यांनी महिलांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी या बाबत मार्गदर्शन केले. याबरोबरच मिनाक्षी नाईक यांनी महिलांनी आपल्या किशोरवयीन मुलींशी संवाद साधताना मुलींवर होणारे कौटुंबिक अत्याचार याविषयी मार्गदर्शन केले. समाजातील बऱ्या वाईट गोष्टींविषयी योग्य प्रकारे मार्गदर्शन करावे, चांगलें संस्कार द्यावेत असे सांगितले प्राथमिक आरोग्य केंद्र कसालच्या समुदाय आरोग्य अधिकारी रेश्मा जंगले, एस. एस. पेडणेकर, श्रीमती अंकिता गवरे, अक्षय राऊळ यांनी महिलांची तपासणी केली.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अणाव सरपंच लीलाधर अणावकर, उपसरपंच आदिती अणावकर, ग्राम पंचायत सदस्य गजानन कुळकर्णी , सदस्या मृणाल परब, सुवर्णा परब, श्रद्धा दळवी, महिमा जिकमडे, रावजी जिकमडे, किशोर पारकर, शाम अणावकर तसेच ग्राम पंचायत कर्मचारी, स्वयंभू रामेश्वर मित्र मंडळ, चित्रा बागायतकर ममता कुळकर्णी तसेच शिवसेना कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली.





