संपामुळे दहावी बारावीच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता.?

64

सिंधुदुर्ग : जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी आणि शिक्षकांनी पुकारलेल्या संपाचा परिणाम दहावी आणि बारावीच्या निकालावर पडण्याची शक्यता वर्तवली जातेय, मुख्याध्यापक आणि शिक्षक कनिष्ठ महाविद्यालय संघटनांनी संपात सहभाग घेतला असून दहावी बारावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पुन्हा प्रश्नांच्या जाळ्यात अडकली आहे. जुनी पेन्शन योजनेची मागणी पूर्ण न झाल्यास बेमुदत संप कायम करून उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकल्याची माहिती दिली आहे.