मालवण : माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण भाजप युवा मोर्चा वतीने बीच डे नाईट हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन १५ मार्च रोजी चिवला बीच मालवण येथे करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन दत्तात्रय केळुसकर व तुळशीदास गोवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, आबा हडकर, बंड्या पराडकर, भाजप युवमोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, उपाध्यक्ष सौरभ ताम्हणकर, अमू हर्डीकर, निषय पालेकर, राकेश सावंत, निकीत वराडकर, फ्रान्सिस फर्नांडिस, जोंटी फर्नांडिस, राज कांदळकर, चेतक पराडकर, विशाल गोवेकर यासह स्पर्धा आयोजक सौरभ ताम्हणकर मित्रमंडळ, चिवला बीच वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिक, चिवला बीच धुरीवडा मित्रमंडळ व अन्य उपस्थित. सुदेश आचरेकर व सौरभ ताम्हणकर यांनी स्पर्धेस शुभेच्छा देत विचार मांडले. स्पर्धेत रत्नागिरी, कोल्हापूर, गोवा, सिंधुदुर्ग निमंत्रित १६ संघ सहभागी. स्पर्धेतील विजेत्या संघास ११,१११ तर उपविजेत्या संघास ५,५५५ व अन्य पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.





