मा. खा. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवणात विविध प्रशिक्षणांचे आयोजन

66

मालवण : भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार १७ मार्च दुपारी ३ वाजता दैवज्ञ भवन मालवण येथे मोफत कुकीज अर्थात वेगवेगळी बिस्किटे बनवणे व मॉकटेल वेगवेगळी सरबत बनवण्याचे प्रशिक्षण भारतीय जनता पार्टी मालवण तर्फे आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष प्रात्यक्षिक व सराव करून घेण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्याबरोबर प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्याचबरोबर पर्यटनाला आवश्यक असणारे नाविन्यपूर्ण व्यवसायाची माहिती यावेळी देण्यात येणार आहे. तरी या प्रशिक्षणाचा सर्वांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पार्टी तर्फे मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर यानी केले आहे.