मुंबई : विधानसभेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशन दरम्याने शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या मागणीनुसार सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण ह्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चालू कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली.
सदर बैठकीला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार डॉ. राजन साळवी, आमदार वैभव नाईक, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार शेखर निकम, आमदार जयंत पाटील, आमदार प्रशांत ठाकूर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.





