Home महाराष्ट्र आ. योगेश कदम यांचा अपघात नसून घातपाताचा कट? | रामदास कदम यांचा...

आ. योगेश कदम यांचा अपघात नसून घातपाताचा कट? | रामदास कदम यांचा गंभीर आरोप

रत्नागिरी : आमदार योगेश कदम यांच्या गाडीला झालेला अपघात हा अपघात नसून घातपाताचा कट असल्याचा संशय बाळासाहेबांची शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज केला आहे. काल शुक्रवारी रात्री आमदार योगेश कदम यांच्या गाडीला कशेडी घाटात अपघात झाला. सुदैवाने आमदार योगेश कदम यांना कोणतीही मोठी दुखापत झाली नाही. मात्र, त्यांचा चालक आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या अपघातानंतर योगेश कदम यांचे वडील रामदास कदम यांनी घातपाताचा आरोप केला आहे.