विलवडेत शिमगोत्सव उत्साहात साजरा

77

बांदा  : विलवडे गावाने पारंपरिक लोककला व संस्कृती आणि धार्मिक प्रथा – परंपरा वैशिष्ट्यपूर्णरित्या जोपासत सात दिवशीय शिमगोत्सव उत्साहात  साजरा करण्यात आला.  विलवडे चव्हाटयावर होळी आवारात  गावातील मानकरी , ग्रामस्थ, व सर्व  भाविकांनी युवकांपासून मुंबई,पुणे,गोाव्यातील चाकरमानी, आबालवृद्धानी धुळवट मारल्यानंतर रंग लावून होळी उत्सवाचा आनंद लुटला.

महाराष्ट्रात   कृषी प्रधान गांव  नाैकिक असलेले व निसर्गसंपन्न व जैवविविधतेने समृद्ध असलेले विलवडे गाव.  आजही आपल्या जेष्ठांच्या व गाव मानकरी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गावचे धार्मिक रीतीरिवाज , संस्कृती व परंपरा याचे जतन करीत आहे.  रविवारी सायंकाळी या  होळी कडे  नारळ ठेवून गाराणे घालणे. घोडेमोडणी, नारळ तोंडणीनंतर   ‘ धूळवड ‘ मारून रोबाटांची सुरुवात झाली. पिपळेश्वर  येथे होळीचा नारळ तोडणीनंतर तेरेखोल नदीवर आघोंळ केल्यानंतर  शिमगोत्सवाची सांगता झाली. उद्या सोमवारी  सकाळ पासून संध्याकाळ पर्यत देव  प्रत्येकांची घरी घेत न्हानव्हंनाचा देण्यांचा कार्यक्रम होणार आहे.    – विलवडे चव्हाटयावर होळी आवारात  गावातील मानकरी , ग्रामस्थ, व सर्व  भाविकांनी युवकांपासून आबालवृद्धानी धुळवट मारल्यानंतर   रंग लावून होळी उत्सवाचा आनंद लुटला.