नागपूर : गरम मसाल्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या तेजपत्यांनी ओव्हरलोड भरलेल्या ट्रकला नागपूर भंडारा रोडवरील मसाल्याच्या कंपनी जवळ, मा उमिया धाम, नाका नंबर 5 भंडारा रोडवर आग लागल्याने ट्रकमध्ये असलेला तेजपत्ता आणि ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ट्रकला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लगेच धाव घेत आग विझविली. यात ट्रक आणि तेजपत्ता मिळून 38 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रक विद्युत तारांच्या संपर्कात आल्याने आग लागल्याचा अंदाज अग्निशमन विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.





