दोडामार्ग : चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाचा छाप उमटवणारे यशस्वी अभिनेते तसेच शेतीला महत्त्व पूर्ण प्राधान्य देणारे शेतकरी सयाजी शिंदे यांनी नुकतीच दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात भ्रमंती केली. हेवाळे बांबर्डे येथे असलेल्या मायरिस्टीका स्टॅम्प या दुर्मीळ झाडांची पाहणी करण्यासाठी व निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी आले होते.
हेवाळे बांबर्डे येथे पाच एकर क्षेत्रात मायरिस्टीका स्टॅम्प झाडांची देवराई आहे. गोड्या पाण्यातील दलदलीच्या भागातील वैशिष्टपूर्ण अशी ही झाडे आहेत. या देवराईतील झाडांची पाहणी करताना बांबर्डेमधील राहुल ठाकुर या युवकाने शिंदे यांना या झाडांची सविस्तर माहिती दिली.यावेळी वनविभागाचे कर्मचारी सुद्धा उपस्थित होते





