देवगड : वृद्धाश्रम हे जीवनातील चांगल्या वाईट अनुभवांचे माहेरघर असते सुख दुःखाच्या काळात मिरवणारा अनुभव हा नव्या आयुष्याला गवसने घालत असतो. या अनुभवांना जगण्याचे समर्थ बनवून वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना आपले आयुष्य सुख समाधानी व्यतीत करावे असे मत देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या नगरसेविका सौ ऋचाली पाटकर यांनी व्यक्त केले.
जागतिक महिला दिनानिमित्त देवगडच्या समर्थ प्लाझा मधील महिला ग्रुपने असलदे येथील दिवीजा वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट देण्यात दिली. वृद्धाश्रमाचे सेक्रेटरी संदेश शेटये यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी त्यांनी जेष्ठ नागरिकाची संवाद देखील साधला.तसेच या वृद्धाश्रमाला जीवनाशक साहित्य भेट दिले.
महिला दिनाच्या निमित्ताने का होईना चार वर्षे या वृद्धाश्रमात येण्याचा व येथील ज्येष्ठांची सवांद साधन्याचा वेगळा आनंद आम्हाला मिळतोय असे मत अमिता तावडे यांनी व्यक्त केले.यावेळी नगरसेविका सौ पाटकर समर्थ प्लाझाच्या अमिता तावडे, सुप्रिया गावकर, सई भाबल, संगीता सावळे, रेणूश्री पाटील, सुवर्णा पाटील,वर्षा घोडे, रूपाली लवटे ,आदी उपस्थित होते.





