अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने सावंतवाडीत होणार जिल्हास्तरीय वधुवर मेळावा…!

सावंतवाडी : अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय वधू वर मेळावा रविवार दिनांक 12 मार्च 2023 रोजी आर पी डी स्कूल सावंतवाडी येथे जिल्हाध्यक्ष ॲडवोकेट सुहास सावंत यांच्या संकल्पनेतून प्रत्यक्षात आणला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे, त्या सर्वांना एकत्रित करून आपल्या समाजातील वधूवरांसाठी उपयुक्त आणि सोयीस्कर अशा स्वरूपाचे वधू वर सूचक व्यवस्था असणे गरजेचे आहे म्हणून, हा मेळावा आयोजित केला आहे. याचा मुख्य उद्देश वधू व वरांसाठी हवी असणारी योग्य माहिती स्थळे त्यांच्यापर्यंत पोहोचविणे हा आहे. यामध्ये मुख्य असे की वधू व वराने दिलेली माहिती त्याची सत्यता पडताळणे हाही आहे.

त्यासंबंधीची कागदपत्रे स्थळाच्या माहिती सोबत जोडणे आवश्यक आहे. संपूर्ण माहितीची खात्री आपल्या समाजातील वरिष्ठ पदाधिकारी या महासंघात काम करत आहे ते पडताळून पाहतील व खरी आणि सत्य माहिती वधू-वरांसमोर ठेवतील.या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात वर वधू उपस्थित राहतील. मेळाव्यास उपस्थिती दर्शवावी व प्रत्यक्ष वधू-वर परीक्षण करून आपल्यासाठी योग्य स्थळाची निवड करावी असं आवाहन रवींद्र राऊळ यांनी केलं आहे.