पवित्रा धुरी यांना मानाची पैठणी | जयश्री धुरी उपविजेत्या | माऊली ग्रामसंघ – उत्कर्ष मित्र मंडळाचं आयोजन

वेंगुर्ले : माऊली ग्रामसंघ आणि उत्कर्ष मित्र मंडळ, न्हैचिआड यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमात सौ. पवित्रा धुरी विजेत्या ठरल्या. उपविजेते पारितोषिक सौ.जयश्री धुरी यांनी पटकाविले. तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस सौ. दिपश्री धुरी यांनी जिंकले. या खेळात पंचवीसहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या.
आसोली-न्हैचिआड येथे काल जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या डॉ. सौ. सांडव यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी आसोली सरपंच बाळा जाधव, उपसरपंच संकेत धुरी, ग्रामपंचायत सदस्या राखी धुरी, प्रकाश रेगे, अंकिता केरकर, माऊली महिला ग्रामसंघाचे अध्यक्ष सौ. मेघा धुरी, सचिव सौ. नेत्रा धुरी, कोषाध्यक्ष सौ. सेजल शेठ्ये, लिपिका सौ. लक्ष्मी शेठ्ये, अंगणवाडी सेविका तृप्ती नाईक, आशा सेविका सौ. उन्नती धुरी आदी उपस्थित होते.

याप्रसंगी आयोजित शुभम क्रिएशन प्रस्तुत खेळ पैठणीच्या कार्यक्रमात अंतिम गुणांकन फेरीसाठी सौ. जयश्री धुरी, सौ. दीपश्री धुरी, सौ. अंकिता केरकर, सौ. उत्कर्षा धुरी, सौ. पूनम आडेलकर, सौ. पवित्रा धुरी, सौ. शितल धुरी, सौ. विद्या रेगे आदी आठ महिलांची निवड झाली होती. त्यात १७१ गुण मिळवून सौ. पवित्रा धुरी यांनी मानाची पैठणी जिंकली. तर १७० गुण मिळवून सौ. जयश्री धुरी यांनी द्वितीय क्रमांकाचे बक्षीस जिंकले. दरम्यान १२३ गुण मिळवून सौ. दिपश्री धुरी यांनी तृतीय क्रमांकाचे बक्षीस प्राप्त केले. या पैठणी खेळाचे सूत्रसंचालन शुभम धुरी यांनी केले.