इन्सुलीत साटम महाराज पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम…!

बांदा : इन्सुली कोनवाडा येथील सद्गुरू साटम महाराज मठामध्ये गुरुवार दिनांक 9 मार्च रोजी श्री साटम महाराज पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी 9 वाजता लघुरुद्र, सत्यनारायण महापूजा, दुपारी महाआरती व महाप्रसाद , सायंकाळी 6 ते रात्री 8 पर्यंत स्थानिकांचा भजनाचा कार्यक्रम व रात्री कै सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ यांचा गंगाजल हा ट्रिकसिनयुक्त नाट्यप्रयोग होणार आहे. या कार्यक्रमाचे लाभ घेण्याचे आवाहन कै रमेश नाटेकर मित्रमंडळ व ग्रामस्थांनी केले आहे.