समीर नलावडे – बंडू हर्णेंच्या माध्यमातून स्मशानभूमी नूतनीकरण काम मंजूर…!

कणकवली : नगरसेविका कविता राणे व माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे यांच्या मागणीनुसार कणकवली – निम्मेवाडी येथे स्मशानभूमीचे काम नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून मंजूर झाले व या कामास सुरुवात झाली. तसेच तेथील स्थानिक नागरिकांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक यांचे सर्वांनी मनापासून आभार मानले. कणकवली शहर विकासाचे खरे शिल्पकार नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे हेच आहेत, असेही सांगितले.