सातोसेत ‘संगीत दाक्षायणी’ नाट्यप्रयोग…!

बांदा : सातोसे येथे शिमगोत्सवानिमित्त माऊली नाट्यगंधा सातोसेतर्फे गुरुवार ९ मार्च रोजी रात्री १० वाजता ‘संगीत दाक्षायणी’ हे पौराणिक नाटक सादर होणार आहे. सातोसे देऊळवाडीच्या कै. आबासाहेब सरदेसाई रंगमंचावर नाटक होईल. यात श्री देवी माऊली नाट्यगंधा सातोसेच्या कलाकारांसह गिताली मातोंडकर, स्नेहल गुरव व दीक्षा धुरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नाट्यरसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन सातोसे ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.