बांदा : शेर्ला – खामदेव नाका ते मडुरा मार्गे सातार्डा रस्त्यामध्ये सुधारणा आणि डांबरीकरण करणे यासाठी २६ डिसेंबरला ऑनलाईन तक्रार निवारण पोर्टल वर संबंधित रस्त्याबद्दल अधिकृत तक्रार नोंदवली होती. त्यानंतर ०२.०१.२०२३ आणि ०९.०२.२०२३ ला लेखी निवेदन मा. कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांना दिले होते.
त्या निवेदनाला उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांनी प्रतिसाद देत योग्य माहिती दिली आहे. संबंधित रस्त्यासाठी निविदा मंजुरी प्रस्ताव अधीक्षक अभियंता रत्नागिरी, सार्वजनिक बांधकाम मंडळ यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. याबाबत धनेश मेस्त्री यांनी संबधित विभागचे आभार मानलेत.




