सावंतवाडी : साटेली- कातवडवाडी येथील श्री ‘कुळकार देवस्थानचा वर्धापन दिन सोहळा शनिवार दि ४ मार्च रोजी होणार आहे. यानिमित्त सकाळी पूजा, अभिषेक होणार आहे. दुपारी आरती, तीर्थप्रसाद व महानैवेद्य होणार आहे. सायंकाळी पाच वाजता भजन होणार आहे. त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता दत्तमाऊली दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कातवडवाडी आणि साटेलीतील ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.





