‘त्या’ गावात चोऱ्यांचं सत्र सुरूच | ग्रामस्थ भीतीच्या छायेत

सावंतवाडी :  मळेवाडीतील श्री पतीत पावन भक्ती मंदिरमधील फंड पेटी अज्ञात चोरट्याने फोडून त्यातील रोकड लंपास केली. तसेच मळेवाड माळकर टेंब येथील बंद घर फोडून दीड लाखाचा रोकड लंपास केले. एकाच दिवशी मळेवाड गावात दोन चोऱ्या झाल्याने मळेवाड गावात एकच खळबळ उडाली आहे.

घर फोडी चोरीची फिर्याद पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली असून मंदिरातील फंड पेटी फोडल्याचे उशिरा निदर्शनास आल्याने मंदिर व्यवस्थापनंदाकडून अद्याप पर्यंत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलेली नाही. मात्र उद्या सकाळी मंदिर व्यवस्थापन कडून तक्रार दाखल करणार असल्याची माहिती व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहॆ. या दोन्ही चोरांचा तपास पोलिसांनी जलद गतीने करावा अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.