प्रगतशील शेतकरी, अष्टपैलू सेवकाचा सेवानिवृत्ती समारंभ…!

125

बांदा : श्री. नागेश विठ्ठल सावंत, न्यू इंग्लिश स्कूल मडुरा ( सेवक ) नियत वयोमानानुसार आज २८ फेब्रुवारी रोजी निवृत्त झाले. या वेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून समन्वय समिती सदस्य भिकाजीं धुरी, न्यू इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक सुहास वराडकर, मुख्याध्यापक सावंत, श्री . नाईक, माजी मुख्याध्यापक सदाशिव गवस, दशरथ घाडी, मुख्याध्यपिका पर्येकर, सत्कार मूर्ती नागेश सावंत, सौ. कविता सावंत, शालेय समिती सदस्य आदी उपस्थित होते.

एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, अनेक पुरस्कार प्राप्त आदर्श सेवक, नागरी पुरस्कार व आजीवन विध्यार्थी अशा प्रामाणिक सेवकांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम म्हणजे त्याचा कामाचा गौरव असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. आपल्या कामाच्या ठिकाणी कुठलंही काम वरिष्ठांनी सांगितल्यानंतर ना म्हणणे त्यांना माहीत नव्हतं. मुलांबरोबर त्यांची खूप जवळीक व भावनिक नाते होते. आजारी मुलाला त्याच्या घरी व्यवस्थित पोहोचवणे अशी अनेक जोखमीची कामे नागेश सावंत व्यवस्थित पार पाडत. हसतमुख विनम्र स्वभावामुळे ते सर्वांना नेहमी आपलेसे करून घेत असत.

धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मुंबई संचलित न्यू इंग्लिश स्कूल भेडशी तालुका दोडामार्ग नागेश सावंत यांनी आपल्या नोकरीची सुरुवात केली. तीस वर्ष प्रदीर्घ सेवेत नवभारत विद्यालय परेल मुंबई आणि शेवटच्या टप्प्यात इंग्लिश स्कूल या प्रशालेतून २८ फेब्रुवारी २०२३ रोजी आता वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.

दानशूर आणि सर्व कामाची आवड असलेले व्यक्तिमत्व, निरंतर शिक्षण घेण्याची आवड, सतत वाचन ही त्यांची ओळख. नोकरी करत असताना वयाच्या पन्नासाव्या वर्षी एम. ए. व ग्रंथ शास्त्रातील बि.लीब. ही पदवी नागेश सावंत यांनी संपादन केली. पुढेदेखील वकिली परीक्षा उत्तीर्ण होण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या इच्छापूर्तीसाठी आजच्या कार्यक्रमात त्यांना सर्वांनी शुभेच्चा दिल्या तसेच त्यांना भेटवस्तू देऊनही त्यांचा सत्कार केला.

मान्यवर, त्यांचा मित्रपरीवार व सहकार्यांनी त्यांना आजच्यादिनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देवून त्यांच्याविषयी अनेक किस्से सांगितले. या कार्यक्रमाला भगिनी शाळाचे मुख्याधापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, त्यांचे नातेवाईक आदी उपस्थित होते. नागेश सावंत यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे.