Home ब्रेकिंग न्यूज  नवी मुंबईमध्ये लोकल ट्रेन रुळावरून घसरली…!

 नवी मुंबईमध्ये लोकल ट्रेन रुळावरून घसरली…!

286

बेलापूर खारकोपर मार्गावर घडली दुर्घटना…!

नवी मुंबई : बेलापूर आणि खारकोपर मध्ये धावणाऱ्या लोकल ट्रेनचे तीन डबे आज सकाळी पावणे नऊच्या सुमारास रुळावरून घसरले. देखभाल दुरुस्ती करणारी दुसरी ट्रेन पथकासह ताबडतोब या ठिकाणी पाठवण्यात आली आहे. दरम्यान या अपघातात कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.

मात्र सध्या या मार्गावरून होणारी वाहतूक तूर्तास ठप्प झाली आहे. नवी मुंबई मधील बेलापूर खारकोपर हा मार्ग सध्या सर्वात व्यस्त समजला जातो. सकाळच्या वेळेत घडलेल्या या घटनेमुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे मात्र हाल झाले आहेत. या दुर्घटनेची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. तसेच प्रवाशांना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याची सूचना त्यांनी केली आहे.