पालकमंत्री व आपण दोडामार्गच्या विकासासाठी नेहमीच कटीबद्ध आहोत : दीपक केसरकर, साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्र लोकार्पण

137

दोडामार्ग : अनेक वर्षी लोकांची मागणी असलेलं साटेली भेडशी येथील सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र लोकार्पण करत असताना आपल्याला मोठा आनंद होत असून या भागातील रुग्णसेवा अधिक दर्जेदार बनणार असल्याचं प्रतिपादन मंत्री दीपक केसरकर यांनी केलं. आपली तब्येत बरी नसल्याने आपण प्रत्यक्ष जरी या लोकार्पण सोहळ्यात उपस्थित राहू शकत नसलो, तरी आपलं विशेष लक्ष माझा मतदारसंघ व दोडामार्ग तालुक्यावर असून दोडामार्ग तालुक्यातील विविध मोठ्या विकास कामांसाठी शिंदे सरकारच्या माध्यमातून आपण कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. ही काम भूमिपूजनाची वाट न पाहता प्रत्यक्ष सुरू करण्याचे आदेशही आपण प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व आपण दोडामार्ग तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच कटीबद्ध आहोत, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे.

दोडामार्ग तालुक्यात नव्याने सुसज्ज बांधलेल्या साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राचं लोकार्पण शनिवारी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आल.

यावेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक दयानंद कांबळी, तहसीलदार अरुण खानोलकर, डॉ. रमेश कर्त्सस्कर, डॉ. सारंग, डॉक्टर, तुषार चिपळूणकर आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. आरोग्य अधिकारी कांबळे यांच्या समवेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, दोडामार्ग नगरपंचायत नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, अँड.नीता कविटकर, गोपाळ गवस, शैलेश दळवी, तिलकांचन गवस, माजी सरपंच नामदेव धरणे, संदीप गवस, मायकल लोबो आदींच्या उपस्थितीत फित कापून व नामफलकाचे अनावरण करून रीतसर आरोग्य केंद्र इमारतीचं लोकार्पण केलं.