परफेक्ट अकॅडमीचे प्रा. राजाराम परब यांचा ‘राष्ट्रीय लोकसेवा शैक्षणिक जीवनगौरव सन्मान २०२३’ पुरस्काराने होणार सन्मान

कुडाळ : वात्सल्य सामाजिक संस्था व लोकसेवा फाऊंडेशन, महाराष्ट्र यांच्यातर्फे छत्रपती शिवराय संमेलन आयोजित करण्यात आलं आहे.  यानिमित्ताने शिवविचार व्याख्यान होणार आहे.

या सोहळ्यात परफेक्ट अकॅडमीचे संस्थापक प्रा. राजाराम परब यांचा ‘राष्ट्रीय लोकसेवा शैक्षणिक जीवनगौरव सन्मान २०२३’ या पुरस्काराने सन्मान होणार आहे.  समाजसेविका कमलताई परुळेकर आणि पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्याहस्ते रविवार २६ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता, मराठा समाज AC हॉल, कुडाळ इथं या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.

याबाबतची माहिती निवड समितीच्या अध्यक्षा नेहा परब यांनी दिली आहे.