मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवान मान यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी सायंकाळी मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. भाजपविरोधात देशपातळीवर विरोधकांची आघाडी उभारण्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे समजते. ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना करोनाशी मुकाबला करताना केलेल्या कामगिरीचे केजरीवाल यांनी कौतुक केले.
केजरीवाल आणि मान हे मुंबई दौऱ्यावर होते. त्यांचे दुपारी विमानतळावर आगमन झाल्यावर आम आदमी पक्षाच्या मुंबई अध्यक्ष प्रीती शर्मा मेनन यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. या दौऱ्यात ठाकरे यांनी त्यांना निवासस्थानी चहापानासाठी आमंत्रित केले होते.





