शिवसेना कणकवली शहर प्रमुख पदी सत्यजित उर्फ बाळू पारकर…!

156

कणकवली : शिवसेना कणकवली शहर प्रमुख पदी सत्यजित उर्फ बाळू पारकर यांची नियुक्ती कणकवली येथील मध्यवर्ती कार्यालयात करण्यात आली आहे.

यावेळी जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, जिल्हा खजिनदार भास्कर राणे, महेश तेली, कणकवली कलमठ शहर प्रमुख प्रशांत वनस्कर, दामोजी सावंत, सुनील पारकर तालुका समन्वयक, संदेशजी पटेल, दिलीप घाडीगावकर, मारुती सावंत व अनेक शिवसैनिक उपस्थित होते. दरम्यान यावेळी बाळू पारकर यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.