वेंगुर्ला : वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा बाजारपेठ तिठा येथे दुपारी दोन च्या सुमारास अचानक लागलेल्या आगीमध्ये पाच दुकाने जळाली आहेत. अचानक लागलेल्या आगीमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक पाण्याच्या टँकर बरोबर वेंगुर्ले नगरपरिषदेचा अग्निशमन बंब दाखल झाला असून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आग लागल्याचे समजतांच तात्काळ आजू बाजूच्या नागरिकांनी संबंधित दुकान उघडून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. ही दुकाने जवळजवळ असल्याने तसेच एकमेकाला लागून असल्याने आजूबाजूला आग पसरली. आणि बाजूच्या पाच दुकानांमध्ये ही आग पोहोचली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ या दुकानांमधील साहित्य बाहेर काढून नुकसानी टाळण्याचा प्रयत्न केला आहे. वाढती आग लक्षात घेऊन वेंगुर्ले नगरपरिषदेचा अग्निशमन बंब बोलविण्यात आला असून सध्या आग विझवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत.





