कसाल : सन 2025 पर्यंत क्षयरोग निर्मूलन करायचे असेल तर स्वयंसेवी संस्था, संघटना, दानशूर व्यक्तिंसह समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग व सहकार्य अपेक्षित आहे, असे मत कसाल येथील कोलते हाॅस्पिटल येथे आयोजित क्षयरोग रूग्णांसाठी फूडकीट वाटप कार्यक्रमात जिल्हाक्षयरोग अधिकारी डाॅ. हर्षल जाधव यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल चे अध्यक्ष रो.उदयकुमार जांभवडेकर, माजी अध्यक्ष रो.डाॅ.प्रशांत कोलते उपस्थित होते. मार्गदर्शन करताना डाॅ.कोलते यांनी क्षयरोगाबद्दल माहीती दिली,तसेच क्षयरोग झालेल्या रूग्णाच्या कुटुंबातील व्यक्तिंनी ,क्षयरोग होऊ नये यासाठी प्रतिबंध औषधे घेऊन जिल्हाक्षयरोग टीम ला सहकार्य करावे असे आवाहन केले.रोटरीतर्फे डाॅ.प्रशांत कोलते यांनी दुसर्या टप्प्यात पाच रूग्ण, डाॅ .हर्षल जाधव यांनी दोन रूग्ण ,श्री गोसावी यांनी एक व श्री.उमेश राणे यांनी एक रूग्णाला फूडकिट चे वाटप केले.यावेळी वरीष्ठ उपचार पर्यवेक्षक श्री एल आर, कदम,जिल्हा पी पी एम समन्वयक सिंधुदुर्ग ; श्री. सुरेश मोरजकर, आरोग्य पर्यवेक्षक श्री गोसावी उपस्थित होते.जिल्हयातील एकूण पन्नासहून अधिक दानशूर व्यक्तिंनी जवळपास 97 क्षयरोग असलेल्या रूग्णांना अशाप्रकारे फूडकिट व इतर मदत आतापर्यंत केलेली आहे.याबाबत जिल्हाक्षयरोग अधिकारी यांनी समाधान व्यक्त केले..





