बांदा रोटरी क्लब व रोटरॅक्ट क्लबतर्फे लाभार्थ्यांना धान्य वाटप…!

बांदा : रोटरी क्लबच्या ११८ व्या वर्धापन दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ बांदा व रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा यांच्यातर्फे क्षयरोग ‘निक्षयमित्र’ या उपक्रमा अंतर्गत लाभार्थ्यांना धान्य वाटप करण्यात आले.

यावेळी बांदा रोटरी क्लबचे अध्यक्ष मंदार कल्याणकर, उपाध्यक्ष प्रमोद कामत, सचिव फिरोज खान, खजिनदार बाबा काणेकर, रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदाचे अध्यक्ष अक्षय मयेकर, उपाध्यक्ष संकेत वेंगुर्लेकर, सहसचिव मिताली सावंत, सदस्य आबा धारगळकर, सुधीर शिरसाट, आपा चिंदरकर, सुदन केसरकर, हनुमंत शिरोडकर, डॉ. भालचंद्र कोकाटे, सीताराम गावडे, संदीप देसाई, शितल राऊळ व बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जे. एल. पाटील उपस्थित होते.

यावेळी रोटरीचे अध्यक्ष मंदार कल्याणकर यांनी सर्व क्षयरोग लाभार्थ्यांना नोव्हेंबर २०२२ पासून प्रत्येक महिन्याचे धान्य पुरवले जाते व यापुढेही प्रत्येक महिन्यात पुरवले जाईल असे प्रतिपादन केले. तसेच रोटरॅक्ट क्लब कायम रोटरी क्लबच्या खांद्याला खांदा लावून लोकसेवेत काम करेल असे मत अध्यक्ष अक्षय मयेकर यांनी व्यक्त केले. आभार सुधीर शिरसाट यांनी मानले.