कणकवली : तालुक्यातील नांदगाव येथील वैश्य वाणी समाजाच्या अध्यक्ष पदी माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये तर सचिव पदी ऋषिकेश मोरजकर यांची निवड करण्यात आली आहे. तर कार्याध्यक्षपदी शशिकांत शेटये, उपाध्यक्ष पदी पंढरीनाथ पारकर, खजिनदार मारुती मोरये, सहसचिव दिलिप फोंडके, सह खजिनदार रविराज मोरजकर अशी कार्यकारिणीमध्ये पदाधिकारी असून वैश्य समाज असलेल्या प्रत्येक वाडीतील जास्तीत जास्त सभासद घेऊन जंबो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.





