हुंबरठ येथे चिरे वाहतूक करणारा डंपर पलटी | दोन किरकोळ जखमी

140

कणकवली : तरेळेहुन कणकवलीच्या दिशेने चिरे वाहतूक करणारा डंपर एम. एच. ०७. एक्स. १२०० हुंबरट ब्रिजवर पलटी होऊन अपघात झाला. हा अपघात बुधवारी दुपारी ४ वा. च्या सुमारास झाला. अपघातात चालक राजेश पाटकारे ( वय २६ रा.कोळोशी धनगरवाडी, नांदगाव ) व अरुण जाधव ( वय १२ रा. सावडाव रोड ) हे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे उत्तरासाठी हलविण्यात आले.

अपघात झाल्यावर डंपरमधील माती महामार्गावर पसरली होती. त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. याबाबत अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर फाटक, पोलीस कॉन्स्टेबल दत्ता कांबळे, दिलीप पाटील व श्री. चिंदरकर यांनी घेतली व जेसीबीच्या सहाय्याने माती बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.