देवगड : कोकणची दक्षिण काशी श्रीदेव कुणकेश्वरची महाशिवरात्रि यात्रेच्या निमित्ताने रविवारी श्री देव कुणकेश्वरला सोनी मराठी वाहिनीवरील काही कलावंत मंडळींनी उपस्थिती लावली होती. श्री देव कुणकेश्वराचे दर्शन घेत आशीर्वादही घेतले. या मंडळींमध्ये सोनी मराठी वरील लोकप्रिय मालिका ‘जीवाची होतीया काहिली’ मधील कलावंत राज हंसनाळे (अर्जुन रांगडे पाटील फेम) व अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर (रेवती कोकटनुर फेम) तसेच नाथ संप्रदायावर आधारित असलेली सोनी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘गाथा नवनाथांची’ यामधील लोकप्रिय कलावंत नकुल घाणेकर (गोरक्षनाथ व महादेव फेम), सुश्रुत मुळावेकर ( कानिफनाथ फेम) तसेच महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेल्या ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या विनोदी मालिकेतील लोकप्रिय कलावंत निखिल बने व कोकणकन्या रसिका वेंगुर्लेकर यांचा समावेश होता.


रविवारी सकाळपासून कुणकेश्वर मधील काही भागाचे त्यांनी चित्रीकरण केले आहे.दरम्यान, श्री देव कुणकेश्वर देवस्थान कमिटीच्यावतीने सर्व कलावंतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व कलावंतांनी उपस्थित भाविक-भक्तांना संवाद साधत हसतखेळत गमती जमती देखील केल्या. देवस्थान कमिटीचे अध्यक्ष संतोष लब्दे, उपाध्यक्ष दिनेश धुवाळी तसेच सर्व संचालक मंडळ व व्यवस्थापक यांनी कलावंतांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले. यानंतर कलावंतांनी उपस्थित प्रेक्षक व भक्तगणांशी मुक्त संवाद साधला.





