कुणकेश्वरच्याच आशीर्वादाने ८ वर्षे आमदार म्हणून सेवा करण्याची संधी : नितेश राणे

105

देवगड : श्री देव कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रेला स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून पहिल्या पूजेसाठी मी आणि माझे कुटुंबीय कुणकेश्वरचा आशीर्वाद घेण्यासाठी येतो. गेली ८ वर्षे या भागाचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून कुणकेश्वराच्या आशीर्वादाने या मतदारसंघातील लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली. दरवर्षीप्रमाणे श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टने यावर्षी चांगल्या पद्धतीचे नियोजन केले आहे. शासन ,पोलीस प्रशासन त्यांची चांगली मदतसुध्दा या निमित्ताने मिळत आहे. कुणकेश्वर यात्रेला येणाऱ्या प्रत्येक भाविकांना संकेश्वरचे दर्शन घेताना चांगली सुविधा या निमित्ताने भेटेल असा मला विश्वास आहे.

दोन वर्षे कोरोनामुळे सगळ्यात धार्मिक गोष्टींना अडचण होती. दोन वर्षानंतर सर्व भाविकांना धार्मिक स्थळांच्या आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली आहे . त्यामुळे यावर्षी ट्रस्टने केलेलो दर्शन रांगांबरोबर इतर नियोजनही नियोजन हे कौतुकास्पद आहे. महाराष्ट्राच्याच नव्हे ते देशाच्या कानाकोपऱ्यातून जे भावीक कुणकेश्वरला येतील त्यांना चांगला अनुभव या ठिकाणी मिळेल असा विश्वास आपणाला असल्याचे मत नितेश राणेंनी यावेळी व्यक्त केले.

श्री देव कुणकेश्वराची पूजा श्री व सौ नितेश राणे सहकुटुंबच्या वतीने करण्यात आली. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष लब्दे यांच्या हस्ते आमदार नितेश राणे यांचा शाल श्रीफळ व कुणकेश्वर मंदिराची फोटो प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, कुणकेश्वर सरपंच चंद्रकांत घाडी, उद्योजक एकनाथ तेली , विजय वाळके नगरसेविका प्रणाली माने, तालुकाध्यक्ष डॉ अमोल तेली, अमित साटम, दया पाटील,अण्णा वाळके, मिठबाव सरपंच भाई नरे आदी उपस्थित होते.