शिवसैनिकांवर हल्ले झाले तर कनेडी पॅटर्न : संजय राऊत

कणकवली : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे कणकवली पटवर्धन चौकात सिंधुदुर्ग शिवसेना कडून भव्य स्वागत करण्यात आले. आज सकाळी लागलेल्या “इलाका तेरा धमाका मेरा” या बॅनर नंतर या दौऱ्याची उत्सुकता लागून राहिली होती. हा बॅनर दुपारी नगरपंचायत प्रशासनाने काढल्यानंतर या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांच्या दौऱ्याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिले होते. मात्र कणकवलीत आल्यानंतर संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीने राणेंसह शिंदे गटावर देखील तोफ डागली. यापुढे शिवसैनिकांवर हल्ले झाले तर कनेडी पॅटर्न राबवण्याचा इशारा देखील त्यांनी दिला.

खासदार संजय राऊत यांच्या स्वागता प्रसंगी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, माजी महापौर दत्ता दळवी, जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, अतुल रावराणे, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, तालुका समन्वयक तेजस राणे, राजू राठोड, सचिन सावंत, जान्हवी सावंत, नगरसेवक कन्हैया पारकर, शहर प्रमुख प्रमोदशेठ मसुरकर, उमेश वाळके, शिल्पा खोत, तालुकाप्रमुख मंगेश लोके, प्रथमेश सावंत, शैलेश भोगले, रमेश चव्हाण, बाळा गावडे, वैदेही गुडेकर, महेश देसाई, हरकुळ सरपंच आनंद ठाकूर, बाळा गावडे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी जोरदार घोषणाबाजी करत संजय राऊत यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेना नेत्यांनी राणेंवर टीका केली. खासदार विनायक राऊत यांनी शब्दात राणेंचा समाचार घेतला.