कुणकेश्वर यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज…!

देवगड : देवगड तालुक्यातील श्री देव कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रोत्सवाकरिता सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. यात्रा उत्सवासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी १, पोलीस निरीक्षक ६, सहाय्यक पोलीस निरीक्षक ६, पोलीस उपनिरीक्षक १० असे २९ पोलीस अधिकारी आणि पुरुष व महिला कर्मचारी १३० एकूण १५३ पोलीस अधिकारी यासोबतच १०८ होमगार्ड आणि आरसीपीच्या ३० जवानांची टीम तैनात करण्यात आली आहे.

कुणकेश्वर महाशिवरात्रि कालावधीत वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी तीन ठिकाणी पार्किंगची सुविधा करण्यात आली असून या ठिकाणी वाहतूक पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.