तलाठ्यांनी वाळू माफियांवर केली मोठी कारवाई…!

सावंतवाडी : आरोंदा सावरजुवा येधे तेरेखोल खाडीत बुधवारी आरोन्दा तलाठी पास्ते यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत वाळु माफियानवर धडक कारवाई केली. या कारवाईत होडी सह सुमारे चार ब्रास वाळु जप्त करण्यात आली. अनधिकृत वाळु उपसा करणाऱ्या कामगारांना राहण्यासाठी बांधण्यात आलेल्या झोपड्या ही उध्दवस्त करण्यात आल्या.

वाळु काढण्यासाठी बे कायदेशीर बांधलेले रँप ही मोडुन टाकण्यात आले. बेकायदेशीर रीत्या वाळु उत्खनन कररणारे कामगार मात्र पळुन जाण्यात यशस्वी ठरले. तर वाळु भरलेला डंपर घेवून चालक फरार झाला. तलाठी डी. पी. पास्ते यांच्या पधकाने ही धडक कारवाई केली. तेरेखोल नदीत खाडित बेकायदेशीर रीत्या गेले काही दीवस वाळु उत्खनन होत असल्याची चर्चा होती. या कारवाई वेळी आजगाव मंडळ अधिकारी कोदे, मळेवाड तलाठी गोरे उपस्थित होते. या कारवाईमुळे स्थानिक ग्रामस्थ व मच्छीमार बांधव यांच्यातून समाधान व्यक्त केले जात आहे.