Home महाराष्ट्र कणकवली कणकवली बांधकारवाडी परिसरातील तुंबल्याने गटारांची साफसफाई

कणकवली बांधकारवाडी परिसरातील तुंबल्याने गटारांची साफसफाई

25

 

रविवारची सुट्टी असूनही नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी घेतला सहभाग; गटाराच्या स्वच्छतेबद्दल नागरिकांनी व्यक्त केले समाधान

कणकवली (प्रतिनिधी)

कणकवली बांधकरवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून गटारे तुंबल्याने सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली होती. ही समस्या मार्गी लावण्यासाठी आज सकाळी तातडीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. विशेष म्हणजे, रविवारची सुट्टी असूनही नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी या कामात स्वतःला झोकून दिले.

नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसले, तरी तेजस राणे आणि सुमित राणे यांनी जनतेशी असलेली नाळ तुटू दिली नाही. “निवडणुकीतील निकाल काहीही लागला असला, तरी बांधकरवाडीतील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यांच्या या तत्परतेचे परिसरात कौतुक होत आहे.

या मोहिमेदरम्यान गटारांमधील कचरा आणि साचलेला गाळ उपसून पाण्याचा निचरा मोकळा करण्यात आला. यावेळी नगरपंचायतीचे ध्वजा उचले, मनोज धुमाळे, भिवा परब, बंडू कलिंगन, सत्यवान राणे, मंगेश घाडीगावकर, किशोर उबाळे, मेघन मुरकर यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.