जामसंडे गुटखा प्रकरणी संशयिताला अंतरिम जामीन मंजूर ; दरम्यान कर्नाटक मधील मुख्य सूत्रधार अद्याप फरारी

1
Oplus_16908288

जामसंडे गुटखा प्रकरणी संशयिताला अंतरिम जामीन मंजूर ; दरम्यान कर्नाटक मधील मुख्य सूत्रधार अद्याप फरारी

संशयित आरोपीच्या वतीने अँड कौस्तुभ मराठे यांनी पहिले काम

देवगड (प्रतिनिधी)

जामसंडे बाजारपेठ येथे विक्री करण्याच्या उद्देशाने दुकानात लपवून ठेवत रक्कम रुपये
३७,८४४/- किंमतीचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाचा साठा केल्याप्रकरणी संशयित आरोपी अनिकेत रामचंद्र लाड याला मे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सौ. एस. एस. देशमुख यांनी अंतरिम जामीन मंजूर केला आहे. याकामी आरोपीतर्फे देवगड येथील अँड कौस्तुभ मराठे यांनी यशस्वी युक्तीवाद केला व अँड. आशिष लोके यांनी त्यांना सहाय्य केले.

जामसंडे बाजारपेठ येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण यांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ दुकानात लपवून ठेवलेले
मिळून आले होते. सदरचा साठा विक्री करण्याचे उद्देशाने बाळगल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

याकामी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने भारतीय न्याय संहिता कलम १२३, २७४,२७५, ३(५) सह अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ कलम २६ (२) (iv), २७ (३) (d),२७ (३) (e), ३० (२) (अ), ५९ या कलमांप्रमाणे संशयित आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला होता.

आरोपीने त्याचे वकीलांमार्फत दाखल केलेल्या अंतरीम जामीन अर्जावर सुनावणी घेत मे. अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला अंतरीम जामीन मंजूर करण्याचा आदेश दिला आहे.

यामध्ये अन्य दुसरा आरोपी इरशाद गव्हाणे ने कर्नाटक मधून सर्वत्र गुटखा पुरवठा करत
असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून तो अद्याप फरारी आहे व देवगड पोलीस त्याचा शोध घेत आहेत.