सावंतवाडी (प्रतिनिधी)
२९ सप्टेंबर २०२५ ला श्रीराम वाचन मंदीर येथे सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलन नियोजन सभा
महाराष्ट्र राज्य शासनाने संकल्पित जिल्हा साहित्य संमेलन २०२५ च्या आयोजनाचा बहुमान श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी या संस्थेला दिला आहे. रविवार २8 डिसेंबर २०२५ ही संमेलनाची तारीख निश्चित झाली आहे. या साहित्य संमेलनाच्या नियोजनासाठी साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य प्रा. प्रवीण बांदेकर, श्री. भरत गावडे व श्री. विठ्ठल कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत 29 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता श्रीराम वाचन मंदीर सावंतवाडी येथे सभा आयोजित करत आहोत. तरी या सभेला उपस्थित रहावे असे आवाहन रमेश बोंद्रे, कार्यवाह
श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी यांनी केले आहे.





