मडुरा तंटामुक्ती अध्यक्षपदी प्रितेश गवंडे यांची बिनविरोध निवड

3
बांदा (प्रतिनिधी)
मडुरा तंटामुक्ती अध्यक्षपदी प्रितेश गवंडे यांची बिनविरोध निवड

मडुरा गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी प्रितेश गवंडे यांची बिनविरोध निवड ग्रामसभेत करण्यात आली.
यावेळी ग्रामसेवक, पोलीस पाटील नितीन नाईक, सरपंच उदय चिंदरकर, उपसरपंच बाळू गावडे, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नाली परब तसेच उल्हास परब, मिरा प्रभू, निखिल कोरगावकर, दिनेश राऊळ, गिरीश मयेकर, रामदास गवंडे, विजय गवंडे, प्रविण परब आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच अंगणवाडी सेविका पल्लवी गवंडे, उज्वला परब, पल्लवी परब, अभिषेक राऊळ, तन्वी परब, संतोष हीराजी परब, नकुल परब, जगन्नाथ परब, लक्ष्मण गवंडे, आनंद पेडणेकर, सोनू शेट्ये, संदीप परब, हेमंत मेस्त्री, प्रकाश वालावलकर, सिद्धेश नाईक तसेच गावचे वैद्यकीय अधिकारी यावेळी सहभागी झाले होते.

प्रितेश गवंडे यांच्या निवडीने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील विविध वादविवाद सोडवले जातील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.